Wednesday, August 8, 2007

माझा जाहीरनामा (याने के जे आयुष्याचा खूप विचार करतात त्यांच्याकरता मला काही समजलेल्या गोष्टी )

फारच थोड्या गोष्टी स्थिर, अचल , असतात. त्या तशा मिळाल्या तर जतन करायला हव्यात. पण नाही मिळाल्या तरी आपण फारसे गरीब नाही होत. साक्षात् जी ए अपुरे तरी वाटू शकतात किंवा आपल्या स्वतःच्या जळत्या प्रश्नांची उत्तरे जवळ नसल्यासारखे. हृदयनाथमधे तोचतोपणा वाटायला लागतो. अचानक वपुकाळे वगैरेंबद्दल आणि ते वाचणाऱ्यांबद्दल दाखवलेल्या क्रौर्याचा पश्चात्ताप होऊ शकतो. आयुष्याची किंमत म्हणा, त्याचा अर्थ म्हणा, या गोष्टी तुमच्या तुम्ही ठरवायच्या. इतरांच्या मूल्यमापनाकरता जगायला लागणे , सतत त्यांच्या मोजपट्टीकरता उंच उंच उड्या मारणे यात खूपच वेळ वाया जातो. हाती लागते ते अप्राप्य मृगजळ. हपापलेपणात जसा अर्थ नाही तसा न झेपलेल्या निरिच्छतेमध्येसुद्धा. ज्ञानाचे, वैराग्याचे, चांगुलपणाचे बुरखे प्रसंगी उघडउघडच्या स्वार्थीपणा, कोतेपणा आणि बावळटपणापेक्षा वाईट. इन जनरल , बुरखे वाईट. आनंदाची निधाने शोधायला हवीत. मिळाली तर थोडे स्वार्थी होऊन उपभोगायला हवीत. उपभोगताना अपराधीपणाची लक्तरे टाकायला हवीत. उच्चभ्रूत्त्वाचा मलिन लगदा निपटायला हवा. शरीराला घालून पाडून वागवणें चूक. अस्थिर मनाच्या आंधळी-कोशींबीरीत साथ देते ते शरीर. शरीर सलामत तो आत्मे पचास, विचार हजार, तत्त्वज्ञान लाख.रोज नवा शोध लावायला हवा. रोज नवा हेतु शोधायला हवा. नवा अर्थ शोधायचा ध्यास हवा. प्रत्येक नव्या सकाळी आपण कोरे असतो. मनापासून हसण्या-रडण्याची काहीतरी कारणे शोधायला हवीत. स्वत:चे हरवलेले माणूसपण पुन्हा शोधायला पाहिजे.

12 comments:

Meghana Bhuskute said...

...हपापलेपणात जसा अर्थ नाही तसा न झेपलेल्या निरिच्छतेमध्येसुद्धा. ज्ञानाचे, वैराग्याचे, चांगुलपणाचे बुरखे प्रसंगी उघडउघडच्या स्वार्थीपणा, कोतेपणा आणि बावळटपणापेक्षा वाईट. इन जनरल , बुरखे वाईट...

अगदी खरंय.

Sumedha said...

छान लिहीले आहे!

इतरांच्या मुल्यमापनाकरता न जगणे एक वेळ सोपे आहे, पण स्वत:च्या मुल्यमापनाकरता न जगणे कठीण. आता हेच बघ न, "रोज नवा शोध लावायला हवा. रोज नवा हेतु शोधायला हवा. नवा अर्थ शोधायचा ध्यास हवा." हे सुद्धा स्वत:कडून अपेक्षा ठेवण्यासारखं नाही का? उठल्यावर जसे वाटेल तसं जगावं. नाही वाटलं रोज नवं तर कुठे बिघडलं? बुरखा तर कित्येक वेळा आपण स्वत:पासूनच घालत नाही न, याची्च शहनिशा करावी वाटते....

MuktaSunit said...

सुमेधा यांस,

तुम्ही तर्काधिष्टित मांडणीमधील विसंगती छान टिपलीत. एक कबुली ही द्यायला पाहिजे की, हे पोस्ट् लिहिताना फारसा सुसंगत विचार नव्हताच केला. कुणास्तवतरी काहीतरी केव्हातरी खरडताना काही विस्कळीत विचार मांडले...आणि ब्लॉग म्हणून रि-सायकल् केले... त्यामुळे अशा ढोबळ निसरड्या जागा त्यात आहेत...

मात्र "स्व" कडूनसुद्धा कसल्याही आकांक्षा बाळगायच्या नाहीत (किंवा बाळगणे सोडून दिले) , या शक्यतेचा विचार मला झेपेना. मी काही फार मोठा गगनभरारी मारणारा कुणी नाही; असलोच तर आपल्या एकंदर खुरटेपणाबद्दल विषाद बाळगणारा कुणी आहे. पण आहे त्यापेक्षा वेगळे करण्याचा, कळण्याचा, होण्याचा विचार थांबला तर सारा मामलाच आटोपायचा की !

अजूनही हा आशेचा अंकुर , आकांक्षेचा बारीकसा किडा , "स्व"ची जाणीव, स्वत:कडून ठेवलेल्या अपेक्षा हा श्रेयसतम घटक वाटतो. त्यांचा पाठपुरावा म्हणजे स्वत:शी केलेली प्रतारणा किंवा घातलेला बुरखा वाटत नाही. अजूनही या एका धाग्यांत जीव गुंतला आहे, किंबहुना त्या एका बारीकशा धाग्याला धरूनच प्रवास चाललाय् असे वाटते खरे या घडीला..

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

HAREKRISHNAJI said...

difficult but not immpossible

Abhijit Bathe said...

अरे काय अल्टिमेट लिहितोयस तु!

सही है - कीप इट अप!!

हे लिहिलं आणि आता पोस्ट करण्याआधी वाचु म्हणुन इतर कमेंट्स वाचल्या.
त्यातली तुझी रेऍक्शन/कमेंट - तुझ्या पोस्ट इतकीच आवडली! :)

a Sane man said...

very true...chhan lihilay

Meghana Bhuskute said...

mi tag kelay.... :(

Meghana Bhuskute said...

lihaaaaaaa............

Samved said...

खरंय मित्रा...

Anonymous said...

Once you accept the fact that you are not going to come this way once again, you take this bold step of living on your own terms. And you are wise enough not to cross the delicate boundary separating pursuit of your own happiness and disregard for what it means to others. Your manifesto makes an interesting and rewarding reading, more so when read with Durga Bhagwat's "Jakkha MhataarpaN" or even the tiny but pregnant "Dehopanishad". I look at this as your epilogue to the concluding pages of GA Kulkarni's devastating "Manase: ArhbaaT AnNi Chillar". I am looking forward to read your appreciation of this master piece ...

Dhananjay said...

nice! just read ur blog! all posts seem interesting.

MuktaSunit said...

Thank you everyone , for your feedback.