Wednesday, January 17, 2018

A Hindi translation of an old Marathi poem by Padma Gole

The reference of this poem came up while speaking with someone. Translated it in Hindi for them. A rather impromptu and - am afraid - an uneven attempt at it. :-)

Padma Gole, the late poet had a mild demeanor and a deceivingly simple way of expressing things. In small ways reminiscent of Emily Dickinson.

Hope some of you might find this amusing.

आताशा मी नसतेच इथे
तशी अजून माझी जा-ये असली तरीही
आताशा मी नसतेच इथे

कुठे म्हणून काय विचारतां?
जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही!

बाकी नसेलही म्हणा,
कारण त्या गावाच्या वाटेला
फारसं कुणी जातही नाही.

तिथे घर म्हणता?
आहे की.
इतकं मोठं, इतकं मोठं की
त्या घराला भिंतीच नाहीत
छत ना?
आहे-नाहीचं.
तसलाच उंबरठा.
त्यावरून वाहते नदी.
नदीत खेळतात चंद्र आणि चांदण्या.
मी ना?
काठाकाठाने निर्माल्य वाहतंय ना? त्यातच असते कुठेतरी
त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नांत.

सोबत आहे की.
आपल्या त्या .. ह्यांची.
नावही आहे त्यांना.
पण मला किनई काही आठवतच नाही.
आताशा मी नसतेच इथे

हळुहळू तुटतंय रेशीम काचणारं
आता गळा मोकळा होतोय
ओठापर्यंत आलंय गाणं
म्हणू का?

यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता
तेव्हाचं गाणं
वस्त्रं केव्हाच गेलीत कदंबावर
- अंतर्पाट होण्यासाठी.
सावधान !

मी झालेय निळं गाणं
निळ्या नदीत वाहणारं
- निर्माल्याबरोबरच.

आताशा मी नसतेच इथे
आताशा मी नसतेच इथे
तशी अजून माझी जा-ये असली तरी
आताशा मी नसतेच इथे
मी नसतेच इथे .

- पद्मा गोळे
----
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं
हां, मेरा आनाजाना होता ज़रूर है
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं

अब इस "कहाँ" का मैं क्या जवाब दूं
ऐसे पूछतेहो जैसे तुम्हें ख़बरही ना हों

हां, शायद सचमुच मालूम ना हों
क्यूंकी उस गाँवकी ओर तो
कोई जाता भी नहीं

वहाँके घरके बारेमें पूछ रहे हो?
है ना.
इतना बडा, इतना बडा की,
उस घरको कोई दीवारही नहीं
और छत?
है-नही के बराबर
वैसीही दहलीज़
जिसपरसे गुजरती है एक नदी
नदीमें खेलते हैं चंदा और तारे
और मैं?
वो जो नदीके किनारेकिनारे बहनेवाले सूखे़ फू़ल दिख रहें हैं ना?
उनमेहीं कहीं,
उनमे, और उन मुरझाये फुलोंके ताजा़ ताजा़ ख्वा़बोंमें

साथ तो हैं वो ,
वो जो हैं ...
नाम भी तो हैं उन्हें अपना
लेकिन आजकल मुझे कुछ यादही नहीं रहता
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं

धीरेधीरे रेशमके ये चुभनेवाले धागे टूट रहें हैं
गीत ज़बानतक आ पँहुंचा है
गा दूं?

जमुना किनारे जब रासलीला रचाई थी
तबका ये गीत
मेरे वस्त्र तो पहलेही कदंबकी शाख पे पंहुंच चुके हैं
विवाह के जोडे़ जो बन गए हैं

मैं अब बन गई हूं
वो नीला नीला गीत
नीली नदीमें बहनेवाला
- उन सूखे़ फुलोंके साथ साथ

आजकल यहां होतीही नहीं हूं मैं
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं
हां, मेरा आनाजाना होता ज़रूर है
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं
होतीही नहीं हूं मैं.

- पद्मा