खूप पूर्वी एक कविता नेटावर वाचली होती. तिचे हे भाषांतर. मूळ कवितेच्या कवीचे नाव "शेल्टन" असे आहे. केरळमधला एक माणूस.
कविता मला खूप आवडली होती - अजूनही खूप आवडते.
In the dimly lit
dusty corner of the office
a slim arrogant cigarette sits
contently smoking John.
Beyond the Alps,
a sleepy village awakens to the
sounds of an aimless football
kicking around a bunch of schoolboys.
On the merciless, mine-studded
streets of Kandahar, a piece of
American bread eats
starving, veiled women.
In distant cities,
books read scholars
bikes ride punks
films watch viewers
groceries buy shoppers
pianos play prodigies
pictures paint artists
bikinis wear babes
fires light arsonists
mountains climb daredevils
love makes couples
islands discover explorers
and the dead speak well of mourners.
While on a crowded train
speeding past coconut groves,
a stupid poem writes me.
ऑफिसच्या मंद उजेडात
एका धुळकट कोपर्यात
एक बारकीशी सिगारेट
पीत बसली आहे जॉनला
निवांतपणे.
तिकडे आल्प्स पर्वतापलिकडे
एक झोपाळलेले खेडे हळुहळू उठते आहे
शाळकरी पोरांना लाथाडणार्या
एका दिशाहीन फुटबॉलच्या आवाजात.
कंदाहारमधल्या क्रूर रस्त्यांवर
अमेरिकन ब्रेडचा तुकडा चघळतो आहे
बुरख्यातल्या एका भुकेल्या बाईला.
दूरदूरच्या नगरांमधे
पुस्तके वाचताहेत विद्वानांना
मोटारबाईक्स चालवताहेत आवारा लोकांना
सिनेमे बघताहेत प्रेक्षकांना
दुकाने खरीदताएत ग्राहकांना
पियानो वाजवताएत वादकांना
चित्रे काढत आहेत कलाकारांना
बिकिनीज घालताएत टंच पोरींना
आगी भडकवताएत घातपाती लोकांना
पर्वत चढताएत साहसवीरांना
प्रणय करतो आहे युगुलांना
बेटे शोधताहेत दर्यावर्दींना
मृतात्मे श्रद्धांजली वाहताएत शोककर्त्यांना.
... जेव्हा नारळीच्या बागांतून पळणार्या
एका गच्च भरलेल्या आगगाडीत
एक वेडी कविता लिहीते आहे मला.
Tuesday, December 9, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Hi MS - खूप दिवसांनी तुझा ब्लॉग पाहिला! शेल्टनच्या कवितेचा अनुवाद खूप अावडला - मराठीत हलकी विनोदी न वाटता तीच्यातला गंभीरपणा (तिच्यातला fatalism?) छान उतरलाय - ठिकठिकाणी "एका" हा शब्द काढून टाकला तर अजून tight होईल का?
Post a Comment